३ हजारची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- बेकायदेशीररित्या गुटखा विक्री व्यवसाय करण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचखोर पोलीस हवालदाराला गजाआड करण्यात आले आहे. तक्रारदाराकडून तीन हजार रूपयांची रोकड स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

वाशी येथील 32 वर्षीय शेतकर्‍याने गुटखा विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी पोलीस हवालदार हनुमंत भगवान काकडे याच्याकडे परवानगी मागीतली. त्याकरिता हनुमंत काकडे याने तीन हजार रूपये लाचेची मागणी केली. शुक्रवारी तडजोडीअंती तीन हजार रूपये स्वीकारण्याचे ठरले. दरम्यान उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर हवालदाराला रोकड घेताना रंगेहाथ पकडण्याकरिता शुक्रवारी दुपारी सापळा लावला. या सापळ्यात लाचखोर काकडे अलगद येवून अडकला. तक्रारदार शेतकर्‍याकडून तीन हजार रूपयाची रोकड स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काकडे या पोलीस हवालदारास ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काकडे याच्या उस्मानाबाद येथील घराची बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी चौकशी देखील होण्याची शक्यता आहे.

Loading...
You might also like