10 हजाराची लाच घेताना कृषी सहाय्यक अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन  –  शेततळ्याचे मंजूर झालेले बिल काढून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना जळगाव तालुकआ कृषी सहाय्यक अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले.
जाबराव तारूबा गवई (रा. जळगाव) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

गवई हे जळगाव तालुका कृषी कार्यालयातील काझेगाव प्रभार मडाखेड येथे कृषी सहाय्यक म्हणून नोकरीस आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात कृषि योजनेतुन शेत तळे केले आहे. त्या शेततळ्याचे अनुदानाचे बिलासाठी त्यांनी अर्ज होता. ते बिल काढून देण्यासाठी लोकसेवक गवई यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज पथकाने तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना जाधव पथकातील रवींद्र दळवी, विनोद लोखंडे, काझी यांनी केली.