2000 रुपयाची लाच स्विकारताना सहाय्यक लेखा अधिकारी व जिल्हा प्रभारी व्यवस्थापक ACB च्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सहाय्यक लेखा अधिकारी व जिल्हा प्रभारी व्यवस्थापक (महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद) यांना 2000 रूपयाची लाच घेतना रंगेहात पकडण्यात आले.

तक्रारदार यांची लहान बहिण यांनी महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ उस्मानाबाद या कार्यलयात थेट कर्ज योजनेमधुन 1.00000/रु कर्ज मंजूर केले होते. त्यातील पहिला हप्ता 71250/रुपयेचा मिळाला. दुसरा हप्ता 28750/रुपये तक्रारदार यांची बहीण कर्जदार यांचे बॅक खात्यात जमा करण्यासाठी महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ उस्मानाबाद या कार्यालयातील साहाय्यक लेखा अधिकारी रमेश धावारे हे तक्रारदार यांचेकडे 2000/रुपये लाचेची मागणी करीत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक रवींद्र भा. थोरात व जी. एस. पाबळे यांनी तक्रारीची शहानिशा करून श्री ए. एच. हुकले. पोलीस निरीक्षक व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद टिमच्या साहाय्याने महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद येथे सापळा रचला होता.

रमेश राजाराम धावारे (वय 53 वर्ष) (सहाय्यक लेखा अधिकारी. महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद) व जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याने धावारे यांनी तक्रारदार यांना 2000 रुपये लाच रक्कमेची मागणी करून स्वतः स्विकारल्याने त्यानां रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची लाचेची रक्कम ही महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद येथे अ. क. 2 यांचे कक्षात स्विकारण्यात आलेली आहे.

सदर प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1888(सुधारणा _2018)अंतर्गत पुढिल कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी जी. एस पाबळे हे करित आहे.