15000 रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा हिवताप अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – वेतन फरकाचे बील मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करून 15 हजार रुपये स्विकारणाऱ्या नाशिक जिल्हा हिवताव अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. महेंद्र बबनराव देवळीकर असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज नाशिकच्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदार यांना 1986 ते 1992 या कावधीमध्ये एक वेतनवाढ कमी दिलि गेली होती. 2013 मध्ये झालेल्या वेतन पडताळीमध्ये एक वेतनवाढ कमी दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वेतन फरकाचे बिल नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सादर केले होते. हिवताप जिल्हा अधिकारी महेंद्र देवळीकर याने 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 15 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांनी आज (बुधवार) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता महेंद्र देवळीकर याने 20 हजार रुपयांची लाच मागून 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आज जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात सापळा रचून महेंद्र देवळीकर याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी