पंचनामा करण्यासाठी ३००० ची लाच घेताना सहायक अभियंत्यास रंगेहाथ पकडले

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या जनावराचा पंचनामा करण्यासाठी खासगी वाहनाचे भाडे लाच म्हणून स्वीकारणाऱ्या महावितरणाच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक अभियंता समीर सुधाकर शहाणे असे त्याचे नाव आहे.

लोणार तालुक्यातील टिटवी लोणार येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीजेच्या धक्कयाने जनावरे मृत्यूमुखी पडली होती. या जनावराच्या अपघात घटनास्थळास भेट देण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी शहाणे याने तक्रारदाराकडून खासगी वाहनाचे भाडे म्हणून ३ हजार रुपयांची मागणी केली. लोणार येथे केलेल्या मागणीच्या आधारे समीर सुधाकर शहाणे यांनी ३ हजार रुपयांची रक्कम गुरूवारी पंचासमक्ष खामगाव येथे स्वीकारताना शहाणे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून अटक केली आहे.

पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक प्रवीण खंडारे, एएसआय श्याम भांगे, संजय शेळके, दीपक लेकुरवाळे, विजय मेहेत्रे, अर्शीद शेख यांनी ही कारवाई केली.

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

कोलेस्टरॉलने त्रस्त असल्यास करा ‘हे’ उपाय

वेदनेकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका,अन्यथा होऊ शकतात गंभीर समस्या