३२०० रुपयांची लाच घेताना वनविभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रोपांची रक्कम पावती न देता लाच म्हणून स्विकारणाऱ्या अहमदनगर प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्याला ३२०० रुपायांची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) वनविभागाच्या कार्यालयात करण्यात आली. साहेबराव शंकर साळवे (वय-५९ रा. गजानन कॉलनी अहमदनगर) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

साहेबराव साळवे हा नगर प्रादेशिक वनविभागातील नर्सरीत माळी म्हणून काम करतात. याप्रकरणी कडित खुर्द येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय शेतकऱ्याने अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये ४०० बोराच्या झाडांची लागवड करायची आहे. त्या करिता त्यांनी आरोपीकडे रितसर पावतीसह रोपांची मागणी केली. साहेबराव साळवे याने पावती न देता प्रती झाड १० रुपये याप्रमाणे पैशांची मागणी केली. अखेर प्रतिझाड ८ रुपये याप्रमाणे झाड देण्याचे तडजोडीत ठरले. तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचला. आरोपी साळवे याने तक्रारदार यांच्याकडून लाच स्वरुपात ४०० झाडांचे ८ रुपये प्रमाणे ३२०० रुपयांची लाच स्विकारली. लाच स्विकारताना साळवे याला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे आणि त्यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

लठ्ठपणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम, काळजी घेणे गरजेचे

‘या’ घरगुती उपयांनी करा चेहरा मॉइश्चरायईज

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

नोकरी शिक्षणानंतर आता स्थानिक निवडणुकांत मराठा आरक्षण ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like