वनखात्याचा बडा अधिकारी ७० हजार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वनविभागाच्या लगतच्या गावातील नागरिकांना ७५ टक्के अनुदानातून गॅस वितरणाच्या मोबदल्यात गॅस वितरकाकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वन खात्याच्या ‘आरएफओ’स लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य येथे ही कारवाई झाली. या बड्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

शंकरराव ऋषीकेत पाटील (वय ४२, RFO, वनजीव संरक्षण, रेहुकरी अभयारण्य, कर्जत) हे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे गॅस वितरक आहे. शासनामार्फत वन विभागाच्या लगतचे गावातील नागरिकांना ७५ % अनुदानावर गॅस वितरण केले जाते. त्या लाभार्थीची निवड यादी वनविभाग तयार करते. ती यादी गॅस वितरकाकडे वनविभाग देते. तक्रारदार यांनी ४ गावातील २३३ लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन दिले होते. त्याचे बिल तक्रारदार याना अदा झाले होते. अदा रकमेतून त्याने कमिशनपोटी वनखात्याचे अधिकारी पाटील याने प्रति लाभार्थी ३५०/- रुपये प्रमाणे २३३ लाभार्थ्यांचे ८१ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ७० हजार लाच घेण्याचे ठरले. रेहुकरी अभयारण्य येथील विश्रामगृहात पंचा समक्ष ७० हजार स्वीकारताना शंकराव पाटील यांना रंगेहाथ स्वीकारले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने कारवाई ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

Loading...
You might also like