1 लाख रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक आणि सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम नुतनीकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी करून 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना कल्याण तालुक्यातील नांदप ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि ग्रामसेवकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.17) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.

सरपंच अनंता बापू शेलार (वय-50) आणि ग्रामसेवक गजानन काशीनाथ कासार (वय-50) यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.14) तक्रार केली. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जागेवर बांधकाम परवानगीचे नूतनीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सरपंच शेलार आणि ग्रामसेवक कासार यांनी तक्रारदाराकडे 3 लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी तक्रार केली. अधिकाऱ्यांनी मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून 1 लाख रुपयाचा पहिला हप्ता स्विकारताना दोघांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास मते, पोलीस नाईक सचिन मोरे, तानाजी गायकवाड, महिला पोलीस शिपाई अश्विनी राजपूत, चालक पोलीस उपनिरीक्षक एस.एन. कदम यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी