७ हजार रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शौचालयाचे अनुदानाचा धनादेश देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना पाचोडच्या ग्रामसेवकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज बीड बायपास परिसरात करण्यात आली. यावेळी पथकाने लाचेची रक्कम हस्तगत केली.

दीपक बाबुराव क्षीरसागर (वय-४१) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. दीपक क्षीरसागर याच्याकडे पाचोडा गावासह घारदोनचाही अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. घादोन येथील तक्रारदाराने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरासमोर शौचालय बांधले आहे. बांधलेल्या शौचालयाच्या अनुदानाचा धनादेश मिळावा यासाठी तक्रारदाराने ग्रामसेवकाकडे अर्ज केला होता. अनुदानाचा धनादेश देण्यासाठी क्षीरसागर याने ७ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता ग्रामसेवक दीपक क्षिरसागर याने लाचेची रक्कम बीड बायपास जवळ असलेल्या त्याच्या घराजवळ स्विकारणार असल्याचे स्पष्ट झाले. आज पथकाने बीड बायपासजवळ सापळा रचला. सात हजार रुपायांची लाच स्विकाराताना दीपक क्षीसरसागर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे, मारूती पंडित सहायक उपनिरीक्षक बाबुराव वानखेडे, रवींद्र देशमुख, रवींद्र अंबेकर, मिलिंद इप्पर, आशिया शेख आणि चालक संदीप चिंचोले यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा