80 हजाराची लाच घेताना नगररचनामधील कनिष्ठ आरेखक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोलपंपासाठी लागणारी जागा अकृषक करण्याकरिता नगररचना विभागाची नाहरकत परवानगी देण्यासाठी ८० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती सरकारी पंचासमक्ष स्विकारणाèया कनिष्ठ आरेखकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

अनिल लक्ष्मण निकम (कनिष्ठ आरेखक, नगररचनाकार, विकास योजना विशेष घटक, मालेगांव, जि. नाशिक) असे चाल घेतलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे पेट्रोलपंप मंजूर झाला आहे. त्यासाठी लागाणारी जागा अकृषक करण्याकरिता नगररचना विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज असते. तक्रारदारांनी सदर प्रकरणाची फाईल नगररचना विभागात दाखल केली. त्यानंतर अनिल लक्ष्मण निकम यांनी तक्रारदारास संपुर्ण कार्यालयातील लोकांना पैसे द्यावे लागतील म्हणून ८० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदवली. दि. १३ ऑगस्ट रोजी अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये अनिल लक्ष्मण निकम हे ८० हजार रूपयाची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने आज नाशिक येथील पंचवटी कारंजा बसस्टॉपवर सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष अनिल लक्ष्मण निकम यांना ८० हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त