३० लाखाची मागणी करुन १० लाखाचा पहिला हप्ता घेणारा ‘भुकरमापक’ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीच्या झालेल्या मोजणीची प्रत (नकाशा) देण्याकरिता 30 लाखाच्या लाचेची मागणी करून लाच म्हणून 10 लाखाचा पहिला हप्‍ता घेणार्‍या भूमिअभिलेख कार्यालयातील मालवण येथील भुकरमापकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. 10 लाखाची लाच घेताना भुकरमापक रंगेहाथ सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

राजेंद्र तुकाराम परमसागर (45, भुकरमापक, मालवण भूमिअभिलेख कार्यालय, जि. सिंधुदुर्ग) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत तक्रारदाराने ठाणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. अ‍ॅन्टी करप्शन विभागाला या लाच प्रकरणी रविंद्र पांडुरंग अडीसरे (सर्वेअर, भूमी अभिलेख कार्यालय, ठाणे) हवा आहे. त्याला अटक झालेली नाही. तक्रारदारास त्यांच्या जमिनीच्या झालेल्या मोजणीची प्रत (नकाशा) हवी होती. त्यासाठी भुकरमापक परमसागर आणि सर्वेअर यांनी 30 लाखाची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये परमसागर आणि अडीसरे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. अ‍ॅन्टी करप्शन विभागाने सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष भुकरमापक परमसागर यांनी लाचेचा पहिला हप्‍ता म्हणून 10 लाख तक्रारदाराकडून स्विकारले. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, सर्वेअर अडीसरे यांना अटक होणे बाकी आहे. या अ‍ॅन्टी करप्शनच्या सापळयामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

Loading...
You might also like