५० हजाराच्या लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, पोलीस दलात खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी सहमती दर्शवणाऱ्या किनवट पोलीस ठाण्यातील फारार पोलीस निरीक्षक दिलीप तिडके याला अटक करण्यात आली आहे. १४ जूनच्या रात्री तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एका खासगी निवासस्थानी रक्कम देण्याचे ठरले होते. पथकाने छापा टाकल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी तिडके फरार झाले होते. अखेर १९ दिवसानंतर त्यांना अटक करण्यात आली.

लाच स्विकारताना दिलीप तिडके यांच्यासोबत पोलीस नाईक मधुकर पांचाळ, पोलीस शिपाई पांडुरंग बापूराव बोईनवाड या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. मात्र, पोलीस निरीक्षक दिलीप तडके फरार झाले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांना तिडके याच्या घरातून ४ लाख ७२ हजार रुपयांची बॅग घेऊन पळून जाताना मिराशे नावाच्या व्यक्तीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिडके फरार झाले होते.

दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अतिरीक्त सत्र न्यायालयात अपीलही दाखल केले होते. मात्र २९ जून रोजी त्याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायाधीश एस.एस.खरात यांनी फेटाळून लावला होता. अखेर बुधवारी दिलीप तिडके हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. जो व्यक्ती घरातून ४ लाख ७२ हजार रुपयांची बॅग घेवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तो कोण होता, ते पैसे कोणाचे होते याची देखील चौकशी होणार आहे. दिलीप तिडके यांची पूर्ण चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कळवले आहे.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा