वरिष्ठ पोलिस निरीक्षक 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस चौकीचे बांधकाम करण्यासाठी 2 लाख 80 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 1 लाख 20 हजार रूपये यापुर्वीच घेतल्यानंतर उर्वरित रक्कमेपैकी 50 हजार रूपयाची लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षकास लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जाधव असे लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदाराचे वाहन एका गुन्हयात पकडण्यात आले होते. न्यायालयाने ते वाहन सोडून देण्याचे आदेश देखील दिले होते. त्यानंतर देखील पोलिस निरीक्षक विलास जाधव यांनी तक्रारदाराकडे पोलिस चौकी बांधण्यासाठी 2 लाख 80 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

त्यापैकी 1 लाख 20 हजार रूपये तक्रारदाराने पोलिस निरीक्षक जाधव यांना दिले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. आज लाचेचे 50 हजार रूपये घेताना पोलिस निरीक्षक विलास जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई अ‍ॅन्टी करप्शनकडून करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like