1 लाख 75 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका फसवणुकीच्या गुन्ह्यात रोल न दाखविण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून १ लाख ७५ हजार रूपयाची लाच घेणाऱ्या पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (अ‍ॅन्टी करप्शन) रंगेहाथ पकडले आहे. पोलिस निरीक्षकालाच लाच घेताना अटक झाल्याने संपूर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक संतोष गायकर असे लाच घेतलेल्या पोलिस अधिकाèयाचे नाव आहे. एका फसवणूकीच्या गुन्हयात सहभाग न दाखविण्यासाठी निरीक्षक संतोष गायकर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.आर्थिक गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गायकर यांच्याकडे होता. त्या गुन्हयात सहभाग न दाखविण्यासाठी निरीक्षक गायकर हे लाचेची मागणी करीत होते.

तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रूपयाची लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ६ ऑगस्ट रोजी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनकडून सापळा रचण्यात आला. भायखळा येथील मालमत्ता कक्षाच्या कार्यालयात सापळा रचल्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष गायकर यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून १ लाख ७५ हजार रूपयाची लाच घेतली. त्यावेळी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनचे एक पथक निरीक्षक गायकर यांच्या घराची झडती घेण्यासाठी देखील रवाना झाले आहे. चक्क पोलिस निरीक्षकानेच १ लाख ७५ हजार रूपयाची लाच घेतल्याने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like