५ हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वडूज : पोलीसनामा ऑनलाइन दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी मायणी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक सुरेश गुलाब हांगे (वय-४४ रा. पळशी ता. माण) याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच मागितल्याप्रकणी अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्यावर मायणी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास हांगे यांच्याकडे असून या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने हांगे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता हांगे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, हांगे याला संशय आल्याने त्याने पैसे स्विकारण्यास नकार दिली. अखेर लाच मागित्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने हांगे याला अटक केली. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के करत आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –