२ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

खालापूर (रायगड) : पोलीसनामा ऑलनाइन – दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाजवळ केली. विश्वनाथ विठोबा म्हात्रे (वय-५०) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार यांच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी विश्वनाथ म्हात्रे याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितील. तक्रारदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. पथकाने मंगळवारी (दि.२) पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळीमध्ये दोन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाजवळ सापळा रचून म्हात्रे याला तक्रारदाराकडून दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. म्हात्रे याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like