10 हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – जप्तीमधील टेम्पो सोडविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी अंगद मुरलीधर मुंडे (वय-31) या मुंब्रा वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे एक टेम्पो आहे. वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी हा टेम्पो डायघर वाहतूक पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, हा टेम्पो सोडण्यासाठी मुंब्रा वाहतूक उपविभागात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई मुंडे याने 11 सप्टेंबर 2019 रोजी दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीमध्ये मुंडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.11) मुंडे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like