पोलिस ठाण्याच्या आवारातच ५० हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जप्‍त केलेली वाहने सोडविण्यासाठी 1 लाख 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयांवर तडजोड झाल्यानंतर पहिला हप्‍ता म्हणून 50 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

चाकण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद लोखंडे नावाच्या पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराची दोन वाहने चाकण पोलिस ठाण्यात होती. ती सोडविण्यासाठी पोलिस कर्मचारी लोखंडेने तक्रारदाराकडे 1 लाख 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1 लाख रूपयावर सेटलमेंट झाले. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला. त्यावेळी पोलिस नाईक लोखंडे यांनी लाचेचा पहिला हप्‍ता म्हणून 50 हजार रूपये सरकारी पंचासमक्ष स्विकारले. त्यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने तात्काळ ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत येणार्‍या चाकण पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याने 50000 हजाराची लाच स्विकारल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा