2000 रुपयाची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2000 रुपयाची लाच घेताना छावणी विभागातील पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडण्यात आले. औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शनिवार) ही कारवाई केली. प्रदीप हिरालाल धोटे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

पोलीस हवालदार प्रदीप धोटे हे पोलीस स्टेशन छावणी संलग्न सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे नातेवाईकावर गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात भांदवी कलम 107 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईचा बॉण्ड रद्द करण्यासाठी प्रदीप धोटे याना तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पचासमक्ष पडताळणी केली असता धोटे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उप अधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, पोलीस नाईक ब्रह्मंदे, संदिप आव्हाळे, पोलीस शिपाई किशोर म्हस्के, राजेंद्र सिनकर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like