2100 रुपयांची लाच स्विकारतान पोलिसासह पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदारासह कुटुंबियांच्या विरोधात निघालेल्या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी 2100 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याचा खासगी पंटरला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली. ही कारवाई आज (बुधवारी) दुपारी करण्यात आली. शेंदुर्णी दूरक्षेत्रातील पोलीस नाईक गजानन काशिनाथ पवार (वय -44 रा. भडगाव रोड पाचोरा) आणि खासगी इसम कडुबा लक्ष्मण पाटील (वय-52 रा. शेंदुर्णी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जामनेर तालुक्यातील 29 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध निघालेल्या वॉरंटमध्ये तक्रारदार व कुटूंबियांना अटक न करण्यासाठी पाहूर पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या शेंदुर्णी दूरक्षेत्रातील पोलीस नाईक पवार याने 13 ऑक्टोबर रोजी त्याचा खासगी पंटर कडूबा पाटील यांच्यामार्फत 4 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 2100 रुपये देण्याचे ठरले होते. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळी केली असता आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी 2100 रुपयांची लाच स्विकारताना खासगी पंटरला अटक करण्यात आली. त्यानंतर जळगाव येथून पोलीस नाईक पवार याला अटक करण्यात आली.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जी.एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी