3 हजाराची लाच स्विकारताना पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बंद चायनीज गाडी सुरु करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना निगडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधात्मक पथकाने रंगेहाथ पकडले. हि कारवाई निगडी पोलीस ठाण्याच्या समोर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

प्रविण मुळूक असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ट्रान्सपोर्टनगरी येथे एक चायनीज गाडीवर व्यवसाय करतो. ही गाडी अनेक महिन्यांपासून बंद होती. ही गाडी सुरु करण्यासाठी मूळूक याने त्यांच्याकडे पैश्याची मागणी केली. याबाबत त्या व्यवसायिकांनी लुचपत प्रतिबंधात्मक पथकास माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. आज मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या बाहेर लाच स्विकारताना मुळूक याला रंगेहाथ पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Visit : Policenama.com