40 हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – धान्याची तीन वाहने सोडण्यासाठी 90 हजार आणि महिना 15 हजार रुपयांची लाच मागत 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला येथील पोलीस शिपायास एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईने अकोला शहरात खळबळ उडाली आहे.

वसीम करीम शेख (वय ३५) असे पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसीम हे अमरावती जिल्हा पोलिस दलात पोलीस शिपाई आहेत. नेमणुकीस नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात होते. यातील तक्रारदार यांचे धान्याचे वाहने आहेेेत. त्याची तीन वाहने अडविण्यात आली होती. ती सोडविण्यासाठी प्रत्येेेकी 30 हजार रुपये असे 90 हजार तसेच ही वाहने दररोज चालविण्यासाठी 15 हजार रुपये अशी लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज वसीम यांना एसीबीने तडजोडीअंती 40 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला विभागाचे उपअधीक्षक एस. एस. मेमाणे, पोलिस नाईक संतोष दहिहंडे, सचिन धात्रक,अभय बावस्कर व त्यांच्या पथकाने केली आहे.