पुणे : लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बांधकामाची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून साडेचार हजारांची लाच स्विकारणाऱ्याल ग्रामविकास अधिकारी व लिपीकास अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) मांजरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे.

ग्रामविकास अधिकारी प्रदिप महादेव लोणकर (वय-५५) आणि ग्रामपंचायत लिपीक रामदास शिवराम उंद्रे (वय-४९) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी मांजरी खुर्द येथील एका व्यक्तीने लिपीकास अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B07G9JQZTV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92008539-ba69-11e8-ae44-3bcd250fbcdc’]
तक्रारदार यांच्या पत्नीच्या नेवे मांजरी खुर्द येथे शेतजमीन आहे. या जागेवर त्यांनी पत्र्याच्या रुमचे बांधकाम केले आहे. या बांधकामाची ग्रामपंचायत रेकॉर्डच्या ८ अ रजिस्टरला नोद करण्यासाठी अर्ज केला होता. रजिस्टरला नोंद करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी लोणकर याने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले. याची तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे याची तक्रार दिली.

अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज मांजरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून कारवाई केली. लोणकर याने तक्रारदार यांच्याकडून साडेचार हजार रुपयांची लाचेची रक्कम ग्रामपंचायत लिपीक उंद्रे याच्याकडे देण्यास सांगितली. लाचेची रक्कम घेताना दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंध कायद्यानुसार लणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.