बाजार समितीचा सभापती ३ लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – बाजार समितीमध्ये कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया दरम्यान लाचेची मागणी करून ३ लाखाची लाच घेणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात झाल्याने संपुर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शिवाजी चुंभळे असे लाचखोर सभापतीचे नाव असुन त्यांना ३ लाख रूपयाची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. समितीमध्ये कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यादरम्यान सभापती हे कामगारांकडून रोख रक्कमेची मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. चुंभळे यांनी १० लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३ लाख रूपयांमध्ये सेटलमेंट झाली.

दरम्यान, तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज (शुक्रवार) अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने समितीच्या मुख्य कार्यालयात सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष चुंभळे यांनी ३ लाख रूपयाची लाच स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. थेट बाजार समितीच्या सभापतीनेच एवढया मोठया प्रमाणावर लाच घेतल्याने संपूर्ण जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा सखोल तपास चालु आहे. गुन्हा नोंदविण्याचे काम चालु असल्याचे अ‍ॅन्टी करप्शनच्या सुत्रांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –