मुळशी तालुक्यातील तलाठी 10 हजाराची लाच घेतना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यातील सजा भालगुडी येथील तलाठ्याला 10 हजाराची लाच घेतना एसीबीने रंगेहात पकडले. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

सुनील भिकाजी सातुसे (वय 37) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांनी तलाठी कार्यालयात खरेदी केलेल्या जमीनीची सात-बारा सदरी घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक सातुसे याने या सदरी देण्यासाठी त्यांच्याकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी लोकसेवक सातुसे याला 10 हजार रुपयांची लाच घेतना रंगेहात पकडण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like