हवेली तालुक्यातील तलाठी 20 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  जमिनीचे हक्कसोडपत्र व वाटप पत्राची नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच घेताना तलाठ्याला एसीबीने रंगेहात पकडले. हवेली येथील सज्जा सोरतापवाडी येथे ही कडवाई करण्यात आली आहे.

रामकृष्ण तुळशीराम कारंडे (वय 35) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामकृष्ण हे हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. यातील तक्रारदार यांना त्यांच्या जमिनीचे हक्कसोडपत्र आणि वाटप पत्र करायचे होते. त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. यावेळी लोकसेवक रामकृष्ण यांनी त्यांच्याकडे ४० हजारांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. आज सायंकाळी लोकसेवक रामकृष्ण याना तडजोडीत २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.