शाखा अभियंत्याकडून लाच घेणारे जलसिंचन विभागातील २ लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शाखा अभियंत्याकडून 1 हजार 935 रूपयाची लाच घेताना जायकवाडी प्रकल्प जल निसारण बांधकाम उप विभाग क्र. 11 (केसापुरी वसाहत, माजलगाव, जि. बीड) मधील दोन लिपीकांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) अटक केली आहे. शाखा अभियंत्याकडून लिपीकानेच लाच घेतल्याने संपुर्ण जलसिंचन विभागात खळबळ उडाली आहे.

सुरेश त्रिंबकराव थोरात (57, वरिष्ठ लिपिक) आणि गणेश जीवनराव शिंदे (44, कनिष्ठ लिपिक, दोन्ही ः- जायकवाडी प्रकल्प जल निसारण बांधकाम उप विभाग क्र 11, केसापुरी वसाहत, माजलगाव, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 55 वर्षीय शाखा अभियंत्याने (जायकवाडी प्रकल्प-बांधकाम, उप विभाग क्र.11, कार्यालय माजलगाव, जि. बीड) यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली आहे. शाखा अभियंत्याने 16 हजार 128 रूपयाचे बील सादर केले होते. ते बील काढण्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक हे 12 टक्के म्हणजेच 1 हजार 935 रूपयाची लाच मागितली होती. दि. 26 एप्रिल रोजी सरकारी पंचासमक्ष लिपिकांनी लाचेची मागणी केली. आज (शुक्रवार) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ लिपिक सुरेश थोरात यांनी 1 हजार 935 रूपयाची लाच सरकारी पंचासमक्ष स्विकारली. त्यानंतर थोरात आणि शिंदे यांना अटक करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन वाघ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली आहे.

Loading...
You might also like