लाचखोर दुय्यम निबंधक ACB च्या जाळ्यात

पालघरः पोलीसनामा ऑनलाईन – वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकाला 20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी प्रभारी दुय्यम निबंधकाला पालघरच्या लाचलुचपत प्रबंधक विभागाने (acb-arrests-deputy-registrar-charge-bribery-builder) अटक केली आहे.

सर्जेराव अभिमान चाटे (वय 36) असे अटक केलेल्या प्रभारी दुय्यम निबंधकाचे नाव आहे. वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या दत्तात्रेय अपार्टमेंट ह्या इमारतीमधील दोन गाळ्याच्या रजिस्ट्रेशनसाठी दुय्यम निबंधकांनी 30 हजाराची लाच फिर्यादीकडे मागितली. तडजोडी अंती 20 हजारावर व्यवहार ठरल्यानंतर आज संध्याकाळी तक्रारदाराकडून 20 हजाराची लाच स्वीकारताना आरोपी सर्जेराव चाटे यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणाची तक्रार फिर्यादीने पालघरचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक के. एस. हेगाजे यांच्याकडे केली होती.