साडे सात हजाराच्या लाच प्रकरणी ग्रामसेवकासह माजी महिला सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्युत वस्तु ग्रामपंचायतीला पुरविल्यानंतर बिले काढण्यासाठी बिलाच्या 10 टक्के रक्कम लाच म्हणून मागणी करत 7 हजार 500 रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामसेवक आणि माजी महिला सरपंचाविरूध्द वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसेवक आनंदकुमार काशिनाथ होळकर (41, ग्रामसेवक – वर्सुली, अतिरिक्त कार्यभार – कान्हे, ता. मावळ, जि. पुणे) आणि पुनम राजेंद्र सातकर (37, माजी सरपंच, मौजे भामदार पाडाळ, कान्हे फाटा, ता. मावळ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) हा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने ग्रामपंचायतीस विद्युत वस्तु पुरविल्या होत्या. त्याचे बिल काढण्यासाठी आरोपी हे बिलाच्या 10 टक्के रक्कम लाच म्हणून मागत होते. 7 हजार 500 रूपये माजी महिला सरपंच पुनम सातकर यांनी घेतली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/