1500 रुपयांची लाच स्विकारताना अर्थ विभागातील कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भविष्य निर्वाह निधीतील कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी धुळे येथील जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लिपिकाला 1500 रुपयांची लाच स्विकारताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली असून लाचखोर लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास मधुकर पाटील (वय-36 रा. दांडेकर नगर, पिंपराला, जळगाव) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हे शिरपूरचे ग्रामसेवक (वय-36) असून त्यांनी भविष्य निर्वाह निधीतून 50 हजार रुपयाचे कर्ज मिळावे यांसाठी अर्ज केला होता. विलास पाटील हा जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागामध्ये कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असून त्याने कर्ज मंजूर करण्यासाठी ग्रामसेवकाकडे 1500 हजार रुपायांची लाच मागितली. तक्रारदार ग्रामसेवकाने या प्रकरणाची तक्रार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रार दाखल होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचला. लिपीक विलास पाटील याला तक्रारदार यांच्याकडून दीड हजार रुपयांची लाच स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई नाशिक लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, पोलीस नाईक संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
Visit : policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या