५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – परमीट रुमच्या परवान्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला अहवाल पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारताना सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यालाय़ातील पोलीस शिपायाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

युवराज महादेव कुंभार,(पोलीस शिपाई, बं. नं. १९८ वय २९ वर्षे नेमणूक – जिवीशा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण (वर्ग ३)) अशी रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांना परमीट रूमचा परवाना काढायचा आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या जिल्हा विधी शाखेकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवायच्या अहवालासाठी अर्ज केला होता. त्यावेळी पोलीस शिपाई युवराज कुंभार यांनी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने त्याची पडताळणी केल्यावर कुंभार यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचून पोलीस हवालदार युवराज कुंभार यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

आरोग्य विषयक वृत्त-
बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच
#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा
#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’