ACB Demand Case | अ‍ॅन्टी करप्शन न्यूज : 25 हजाराच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार विरूध्द एसीबीकडून गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑलनाइन – ACB Demand Case | 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 25 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य करणार्‍या अहमदनगर पोलिस दलातील (Ahmednagar Police) कोतवाली पोलिस स्टेशनमधील (Kotwali Police Station) सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक अशोक पवार Assistant Police Inspector Vivek Ashok Pawar (35) यांच्याविरूध्द गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. (ACB Demand Case)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेल्या चौघांविरूध्द कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे (Ahmednagar Crime News). दाखल गुन्हयात त्यांना अटक न करता अटकपुर्व जामिन (Anticipatory Bail) मंजूर होण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक अशोक पवार यांनी प्रथम 30 हजार रूपयाची लाच मागितली (Ahmednagar ACB Trap). तडजोडीअंती 25 हजार रूपये घेण्याचे मान्य केले. (ACB Demand Case)

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एपीआय विवेक पवार (API Vivek Pawar) यांच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या पडताळणी दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक अशोक पवार यांनी 25 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. त्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Nashik ACB SP Sharmistha Walawalkar),
अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे
(Police Inspector Sandeep Ghuge), पोलिस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन
आणि पोलिस अंमलदार नितीन नेटारे यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title :-  ACB Demand Case | Anti-Corruption News: ACB files case against Assistant Police Inspector Vivek Ashok Pawar in bribery case of 25 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Koregaon Park Police Station | पुण्यातील उच्चभ्रू परिसर कोरेगाव पार्कमध्ये नेमकं चाललंय काय? भलतेच उद्योग !

MNS Chief Raj Thackeray | ‘यांचं अस्तित्व नरेंद्र मोदीमुळे, यांना कोण ओळखतं’, राज ठाकरेंचा आशिष शेलारांना नाव न घेता टोला