ACB Demand Case | देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता? पोलिसावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Demand Case | देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता म्हणून 2 हजार रूपये प्रमाणे मागील 3 महिन्याचे मिळून 6 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती सरकारी पंचासमक्ष 5 हजार रूपये घेण्याचे मान्य केल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने जालना जिल्हयातील मंठा पोलिस स्टेशनमधील (Mantha Police Station) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (ACB Demand Case)

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत केंद्रे ASI Suryakanta Kendre (54) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीकडून दाखल गुन्हा एएसआय सूर्यकांत केंद्रे यांच्याकडे तपासाला होता. त्या गुन्हयातील दोषारोपपत्र दाखल करावे यासाठी तक्रारदार यांनी एएसआय केंद्रे यांची भेट घेतली. त्यावेळी सूर्यकांत केंद्रे यांनी बीट हद्दीत तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस आणि मासिक हप्ता म्हणून 2 हजार रूपये प्रमाणे मागील 3 महिन्याचे असे 6 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 5 हजार रूपये लाच घेण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुर्यकांत केंद्रे यांनी मान्य केले. त्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Demand Case )

 

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Atole),
अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलिस उप अधीक्षक मारूती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर (Nandkishor Kshirsagar),
पोलिस अंमलदार नागरगोजे, काळे, जोशी, देसाई, ठाकूर आणि बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :  ACB Demand Case | Asking that you sell country liquor, one case per month and monthly installments? Crime against the police by anti-corruption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा