ACB Demand Case | पाण्याच्या टँकरचे बील मंजूर केल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी, आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकावर पुणे अॅन्टी करप्शनकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Demand Case | शासकीय आश्रम शाळेला पुरवण्यात आलेल्या पाण्याचे टँकरचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली. याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) आश्रम शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाविरुद्ध (Headmaster Ashram School) ओतूर पोलीस ठाण्यात (Otur Police Station) गुरुवारी (दि.25) गुन्हा दाखल केला आहे. (ACB Demand Case)
अरुण दगडू महाकाळ Arun Dagdu Mahakal (वय-57) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. याबाबत टँकरने पाणी पुरवठा (Water Supply by Tanker) करणाऱ्या व्यावसायिकाने 3 एप्रिल 2023 रोजी पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. आरोपी अरुण महाळाळ हा जुन्नर तालुक्यातील मुथाळने येथील शासकीय आश्रमशाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांनी आश्रमशाळेला टँकरने पाणी पुरवठा केला आहे. (ACB Demand Case)
टँकरने पुरवण्यात आलेल्या पाण्याचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून अरुण महाकाळ याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरीता पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुणे एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणीमध्ये अरुण महाकाळ याने तक्ररदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी आरोपी अरुण महाकाळ याच्या विरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने (PI Virnath Mane) करीत आहेत.
Web Title : ACB Demand Case Pune anti-corruption case against Ashram school principal for demanding bribe to approve water tanker bills
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Eknath Khadse | ‘तू माझ्यामागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मी मोक्का लावला’, एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
- Maharashtra Police Inspector (PI) Suspended | न्यायाधीशांशी केलेले गैरवर्तन भोवले! वादग्रस्त पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, ज्या ठाण्यात प्रभारी तेथेच FIR
- Widening Of Old Pune Mumbai Road | बोपोडी येथील 63 मिळकती हटविल्या ! जुन्या पुणे- मुंबई रस्ता रुंदीकरणातील मोठा अडसर दूर