Pune ACB Trap | मुकादमाकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी, पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकाला एसीबीकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बदली न करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील (Nagar Road (Wadgaon Sherry) Zonal Office) आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकावर 30 हजार रुपये लाचेची मागणी (Demand a Bribe)केल्या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. सचिन धर्मा गवळी Health Inspector Sachin Dharma Gawli (वय-34) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. पुणे एसीबीने (Pune ACB Trap) सोमवारी (दि.27) येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत वडगाव शेरी कार्यालयात काम करणाऱ्या बिगारी मुकादम यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) 27 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रार दिली होती. तक्राररदार हे वडगाव शेऱी क्षेत्रीय कार्यालयातील बिगारी मुकादम म्हणून घनकचरा व्यवस्थापन/आरोग्य विभागात काम करतात. तक्रारदार यांची वाहतूक विभागातून (Department of Transport) बदली (Transfer) न करण्यासाठी सचिन गवळी याने 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

पुणे एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता सचिन गवळी यांनी तक्रारदार यांची वाहतुक विभागातून बदली न
करण्यासाठी स्वत:साठी व वरिष्ठांसाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आरोग्य निरीक्षक सचिन गवळी यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station)
भ्रष्ट्राचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (PI Praveen Nimbalkar) करत आहेत.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

 

Web Title :- ACB has demanded a bribe of Rs 30,000 from the Mookadam, the health inspector of Pune Municipal Corporation has been arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ashish Chandarana | म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार