Pune : पुण्यात लाचखोरी रोखण्यासाठी ‘गुगल पे’ची ‘मात्रा’?

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनकाळातही पुणे पोलीस लाच (Bribe) खोरीत आघाडीवर असल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागा ( acb maharashtra ) ने अलीकडेच जारी केला होता. ही सर्व प्रकरण मोठ्या रक्कमेच्या लाचखोरीबाबत होती. दरम्यान वाढत्या लाच ( Bribe ) खोरीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस कॅशलेस होण्याच्या अनुषंगाने मोठे पाऊल टाकत आहेत. येत्या काही दिवसांतच पुणे पोलीस Google Pay द्वारे दंडाची रक्कम भरण्याची डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या लाचखोरीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागा ( acb maharashtra ) चा चाप बसणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसात ही योजना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

अनेकवेळा वाहतूक नियमांचे किंवा संचारबंदीचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून नागरिकांची अडवणूक केली जाते.
नागरिकांना जबरदस्तीने 500 रुपयांची पावती करायला सांगतात.
पैसे नाहीत असे सांगितल्यावर पोलीस मित्राच्या अकाऊंटवर गुगल पे करायला सांगतात.
यातून नागरिकांची लूट केली जाते.
टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारण नसताना पोलीस अगदी छोट्या कारणांसाठी पावत्या फाडतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी वरिष्ठ पोलिसांकडे केल्या होत्या.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन व्यवस्था तयार केली आहे.
पोलीस विभागाचे एक स्वतंत्र खाते काढण्यात येणार आहे.
पुणे पोलीस दलातील सर्व 32 पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र स्कॅनिंग कोड दिले जाणार आहे.
त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल केला याची माहिती दररोज सायंकाळी समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !