लाचखोर निघाला माजरी ग्रामपंचायतचा वसुलनिस

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – शौचालयाच्या बांधकामाचा धनादेश देण्यासाठी टाळाटाळ करणा-या आणि पैशाची मागणी करणा-या चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी ग्रामपंचायतीच्या वसुलनिसास 1500 रुपयाची लाच स्विकारताना आज दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रंगेहाथ अटक करण्यात आली.

संजय तानबा सोनारकर (52) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो माजरी ग्रामपंचायतमध्ये वसुलनिस पदावर कार्यरत आहे.एका लाभार्थ्याला शौचालयाच्या बांधकामाचा धनादेश देण्याकरीता त्याने पैशाची मागणी केली. सदर लाभार्थ्याची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

स्वछ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचा धनादेश मिळण्याची मागणी एका लाभार्थ्यांने आरोपी वसुलनीस सोनारकर यांच्या कडे केली होती. दरम्यान धनादेश रक्कम देण्याकरीता लाभार्थ्यांकडून १५०० रुपयांची लाचेची मागणी वसुलनीस संजय सोनारकर याने लाभार्थ्यांकडे केली त्यामुळे लाभार्थ्यांने तक्रार केली असता लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ११ वा. सुमारास माजरी ग्रामपंचायत हद्दीत माजरी कॉलरी चर्च परिसरात सापळा रचून वसुलनीस सोनारकर यांना त्या लाभार्थ्यांकडून १५०० रुपयेची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. दरम्यान सोनारकर विरुद्ध माजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दरम्यान सदर प्रकणातील धनादेश वितरण हे सरपंच व सचिव यांच्या स्वाक्षरीनेच वितरित केले जाते. मात्र या प्रकरणात वसुलनीस लाच घेतांना अडकलाय.यावरून जनसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उदभवले जात आहे. या प्रकरणी अनेक मोठे मासे ए. सी. बी. च्या हाती लागण्याची शक्यता आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, व अप्पर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार, पो. उप अधीक्षक अविनाश भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. वैशाली ढाले, ना.पो. कॉ. अजय बागेसर, पो. कॉ. रवी ढेंगळे, रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे, मपोशि. समीक्षा भोंगळे, व चालक उमेश दाभाडे, सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी सदरची कार्यवाही केली आहे.