Satara News : लाचखोर मंडलाधिकारी ACB च्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –   दहा हजाराची लाच घेणाऱ्या तासगाव (ता. सातारा) येथील मंडलाधिकाऱ्याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 15) रात्री रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत त्याच्या घराची झडती घेण्याचे काम एसीबी आणि सातारा शहर पोलिस करत होते.

संतोष शिवाजी झनकर (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष झनकर हा तासगाव येथे मंडलाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे पुनर्वसनाच्या अनुषंगाने एक अर्ज आला होता. मात्र तो अर्ज निकाली काढण्यासाठी झनकरने तक्रारदाराकडे 10 हजाराची लाच मागितली. तक्रारदाराने 10 हजाराची लाच देण्याचे मान्य केले. मात्र तक्रारदाराने याची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार एसीबीने सोमवारी रात्री शकुनी गणेश मंदिराजवळ सापळा रचून झनकरला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.