२ हजाराची लाच घेणारी महिला ग्रामसेविका अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 2 हजार रूपयाची लाच घेणार्‍या ग्रामसेविकेस पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने काल (सोमवारी) महिला तहसीलदारास एक लाखाच्या लाच प्रकरणी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आज एका महिला ग्रामसेविकेला 2 हजार रूपयाची लाच घेताना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीमती सायरा बानू हमीद पटेल (42, रा. ग्रामसेविका नागपूर जाधववाडी, ता. जुन्‍नर, रा. निमगावसावा, ता. जुन्‍नर) असे लाच घेणार्‍या ग्रामसेविकेचे नाव आहे. याबाबत तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदारास विवाह नोंदणी प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी ग्रामसेविका पटेल यांनी 2 हजार रूपयाची लाच मागितली होती. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ग्रामसेविका लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले.

आज (मंगळवारी) सापळा रचला असता सरकारी पंचासमक्ष ग्रामसेविका पटेल यांनी तक्रारदाराकडून 2 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक नितीन भोयर, पोलिस निरीक्षक अर्चना बोदडे, कर्मचारी विनोद झगडे, वैभव गिरिगोसावी आणि सुप्रिया कादबाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार करावी अन्यथा 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

Loading...
You might also like