अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)ताज्या बातम्यापुणे

10 हजाराची मागणी करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

पुणे पोलीसनामा ऑनलाइन – मारहाण केल्याबाबतच्या तक्रारीत मदत करण्यासाठी 10 हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर एसीबीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिस ठाण्याचा कर्मचारी आहे.

रमेश भगवंत ढोकळे (वय ५५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार व त्यांच्या मुलाच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा तक्रार अर्ज आला होता. यामध्ये मदत करण्यासाठी ढोकळे याने तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खेड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच ढोकळे याच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात देखील लाच घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

Back to top button