लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अकोला पोलीस दलातील एका सहायक पोलिस उपनिरीक्षकावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाड्याने घेतलेला ढाबा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली आहे.

सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जायभाये (वय 53) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पातूर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

जायभाये हे अकोला पोलीस दलात कर्तव्यास आहेत. ते त्यांची नेमणूक पातूर पोलीस ठाण्यात होती. दरम्यान देऊळगाव येथील एका व्यक्तीने ढाबा भाड्याने चालविण्यासाठी घेतला आहे. तो ढाबा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी अमरावती लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास ऐसीबीकडे संपर्क साधावा, असे आवाहन धिवरे यांनी केले आहे.

येथे साधा संपर्क विभाग अमरावती

(दुरध्वनी क्रं 07212552355/ 07212553055)
(टोल फ्रि क्रं 1064)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like