ACB Trap Case | शेतीचा वीजपुरवठा सुरु होण्यासाठी त्यांनी वर्गणी काढून दिली लाच; त्रास देणार्‍या लाईनमनला लाच घेताना पकडले

चंद्रपूर : ACB Trap Case | शेतकर्‍यांच्या शेतीपंपासाठी होणारा वीज पुरवठा लाईनमन जाणीवपूर्वक बंद करायला. शेतकर्‍यांकडून कधी तांदुळ तर कधी पैसे घेतल्यानंतर तो वीजपुरवठा सुरु करायचा़ पिके जळून जाऊ नये, म्हणून शेतकरी हा त्रास सहन करायचे. तीन दिवस वीज पुरवठा बंद ठेवल्याने शेवटी शेतकर्‍यांनी वर्गणी काढून लाचेची रक्कम गोळा करुन लाईनमनला लाच घेताना पकडून दिले. (Bribe Case)

शालेन्द्र देवराव चांदेकर (रा. जवाहरनगर, राजुरा, चंद्रपूर) असे अटक केलेल्या लाईनमनचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे राजुरा तालुक्यातील नवेगांव येथे राहायला आहेत.
मौजा केळझर येथे त्यांची शेती असून तेथे विरुर येथील महावितरणच्या कार्यालयाअंतर्गत शेतपंपाला वीजपुरवठा होतो.
तेथील लाईनमन चांदेकर हे प्रत्येकवेळी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पैशांची मागणी करुन सतत त्रास देत असतात. जुन २०२३ मध्ये वादळी वार्‍यांमुळे शेतीतील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तेव्हा चांदेकर याने पैशांची मागणी केली होती. तेव्हा शेतीपंपधारकांनी पैसे जमा करुन चांदेकर याला दिले होते. चांदेकर हा शेतातील विद्युत पुरवठा जाणून बुजुन वारंवार बंद करुन शेतकर्‍यांना त्रास देत असतो. चांदेकर याने केळझर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून शेतातील विद्युत पुरवठा बंद करुन ठेवला होता. १५ फेब्रुवारी रोजी चांदेकर याचा तक्रारदार यांना फोन आला. तुमच्या शेतातील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करायचा असेल तर प्रत्येकी २० किलो तांदुळ तुम्हाला द्यावा लागेल, असे त्याने सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी आम्ही सर्वांनी तांदुळ विकून टाकला आहे, असे सांगितले. तेव्हा त्याने प्रत्येकी दीड हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.(ACB Trap Case)

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत चांदेकर याने ५ हजार रुपयांची लाच घेण्याचे मान्य केले.
त्यानंतर शेतकर्‍यांनी वर्गणी काढून ५ हजार रुपये जमा केले. तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारताना चांदेकर
ला रंगेहाथ पकडण्यात आले. चंद्रपूर लाच लुचपत विभागाच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही
कारवाई करण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sena Kesari 2024 In Pune | महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी 2024, पृथ्वीराज मोहोळवर मात करीत कोरले चांदीच्या गदेवर नाव

Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी