ACB Trap Case News | एक लाख रूपयाची लाच घेताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | अकोला जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती यांना एक लाख रुपये लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.25) तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली. (ACB Trap Case News)

सभापती सुनील मोतीराम इंगळे (वय – 49 रा. हिवरखेड तालुका-तेल्हारा जिल्हा- अकोला), उपसभापती प्रदीप मधुकरराव ढोले (वय- 62 रा. घोडेगाव तालुका – तेल्हारा जिल्हा- अकोला) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तेल्हारा येथील 29 वर्षाच्या व्यक्तीने अकोला एसीबीकडे तक्रार केली आहे. (ACB Trap Case News)

तक्रारदार यांनी दिनांक 20 सप्टेंबर रोजी अकोला प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दिली की, कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा येथील सन 2022- 23 च्या शासनच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेड खरीप व रब्बी हंगाम हरभरा खरेदी करण्यासाठी तक्रारदार यांनी हमाल पुरवठा केला होता. या हमालीचे 14 लाख 39 हजार 592 रुपये बिल झाले होते. या रकमेपैकी तक्रारदार यांना आत्तापर्यंत 4 लाख 93 हजार रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. उर्वरित 9 लाख 46 हजार 592 रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा यांच्याकडून तक्रारदार यांना मिळणे बाकी आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांना अर्ज केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील इंगळे, उपसभापती प्रदीप ढोले व सचिव सुरेश सोनोने यांनी एक लाख
रुपये लाच मागितल्याची तक्रार अकोला एसीबी कार्यालयात दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने 21 सप्टेंबर
रोजी पडताळणी केली. त्यावेळी उपसभापती प्रदीप ढोले यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली.
तर सभापती सुनील इंगळे यांनी लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सोमवारी प्रत्यक्ष सापळा कारवाई करण्यात आली. उपसभापती प्रदीप ढोले यांना कृषी उत्पन्न बाजार समिती
तेल्हारा येथे तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
एसीबीने दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेतले असून तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे
यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ, पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार,
पोलीस अंमलदार पुरुषोत्तम मिसूरकर, किशोर पवार, दिगंबर जाधव, अभय बावस्कर, सुनील येलोने, श्रीकृष्ण पळसपगार,
निलेश शेगोकार, संदीप ताले, अर्चना घोडेस्वार, दिलीप तीवळकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Auction Sealed Properties PMC Property Tax Due | मिळकतकर थकल्याने सील केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती