ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | सेवानिवृत्तीनंतर सुधारित ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी सहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना मणगाव उपकोषागार कार्यालयातील अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मारुती रामचंद्र पवार Maruti Ramchandra Pawar (वय 56 रा. रूप राज बिल्डिंग, बी विंग, दुसरा मजला, रूम नंबर २०२, रोहा एक्सल कॉलनी जवळ ता. रोहा जि. रायगड) असे लाच घेताना पकण्यात आलेल्या उपकोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि.15) दुपारी दोनच्या सुमारास उपकोषागार कार्यालय माणगाव येथे केली. (ACB Trap Case)

याबाबत 62 वर्षीय महिलेने रायगड एसीबीकडे (Raigad ACB Trap) बुधवारी (दि.13) तक्रार केली आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. निवृत्तीनंतरचे सुधारित ग्रॅज्युटी फरकाची 45 हजार 050 रुपयांच्या रकमेचे बिल मंजूर करून बँक खात्यात जमा करण्याची मंजुरी देण्याकरता मारुती पवार हे 6 रुपये लाच मागत असल्याची तक्रार महिलेने रायगड एसीबीकडे केली. (ACB Trap Case)

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची गुरुवारी (दि.14) पडताळणी केली असता उपकोषागार अधिकारी मारुती पवार यांनी पंचासमक्ष 6 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांनी सापळ्याचे आयोजन केले. मारुती पवार यांना शुक्रवारी सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार यांच्याकडून 6 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना उपकोषागार कार्यालय माणगाव येथे रंगेहाथ पकडण्यात आले. (Raigad ACB Bribe Trap Case)

ही कामगिरी ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (ACB SP Sunil Lohande) ,
अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड अलिबाग एसीबी पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाडावे (DySP Shashikant Padave), पोलीस निरीक्षक नवनाथ चौधरी (Police Inspector Navnath Chaudhary) पोलीस अंमलदार विनोद जाधव, शरद नाईक, महेश पाटील, सचिन आटपाडकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

Nashik Crime News | पती, पत्नी आणि त्याची गर्लफ्रेण्ड…, सततच्या छळा वैतागून तिनं उचललं टोकाचं पाऊल; नाशिक शहरात खळबळ