ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | मोजणी केलेल्या जमिनीची हद्द दाखवून नकाशा तयार करुन देण्यासाठी डहाणू भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखपाल व उप अधीक्षक यांना 30 हजार रुपये लाच घेताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पालघर एसीबीने ही कारवाई सोमवारी (दि.26) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. (Palghar Bribe Case)

अभिलेखापाल गोरख शंकर घुमरे (वय 39 सध्या रा. पारनाका, डहाणू गाव, कायमचा पत्ता गुलमोहर पार्क, बालाजी सुपर मार्केट जवळ, घोरपडी, पुणे मुळ रा. मु.पो. देवारवाडी ता.मालेगाव जि. नाशिक), उप अधीक्षक प्रफुल्ल लक्ष्मण संखे (वय 54 रा. मोरया नगर, विरार (पूर्व) ता.वसई जि. पालघर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत 36 वर्षीय व्यक्तीने पालघर एसीबीकडे तक्रार केली आहे.(ACB Trap Case)

तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाच्या मालकीच्या जमिनीची मोजणी आरोपींच्या कार्यालयाकडून करण्यात आली होती. केलेल्या जमीन मोजणीची हद्द दाखवून मोजणी नकाशा तयार करून देण्यासाठी अभिलेखापाल गोरख घुमरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पालघर एसीबी कार्यालयात तक्रार केली.

पालघर एसीबीच्या पथकाने सोमवारी लाच पडताळणी कारवाई केली. त्यावेळी गोरख घुमरे याने तक्ररदार यांच्याकडे
लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून गोरख घुमरे यांनी 5 हजार रुपये आणि उपअधीक्षक प्रफुल्ल संखे यांनी 25 हजार रुपये लाच
म्हणून स्वीकारले असता दोघांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे,
अपर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस अंमलदार संजय सुतार, नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोये, पोलीस शिपाई चालक जितेंद्र गवळे, सखाराम दोडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका