ACB Trap News | बियर बारचा परवाना मिळवून देण्याच्या मोबदल्यात 5 लाखाच्या लाचेची मागणी, राज्य उत्पादन शुल्कमधील दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | बियर बारचा परवाना मिळवून देण्याच्या मोबदल्यात 5 लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडअंती 2 लाख 60 हजार रूपयांची लाच घेण्याचे मान्य (Akola Bribe Case) केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील (Maharashtra State Excise Department) दोघांविरूध्द अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap News)

विशाल रमेशराव बांबलकर Vishal Rameshrao Bambalkar (36, पद – जवान, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला कार्यालय, रा. चेतना नगर, मोठी उमरी, ता.जि. अकोला) आणि संजय पांडुरंग कुटे Sanjay Pandurang Kute (53, पद – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोट कार्यालय, मुळ रा. घर क्रमांम 47, जी.टी. बाबूजी बडगुजर कॉलनी, जुने धुळे, ता.जि. धुळे. सध्या रा. निमवाडी बस स्टॅन्ड जवळ, अकोला) अशी गुन्हा दाखल (Akola Crime News) करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या जमिनीवर बियर बार सुरू करण्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी सन 2014 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला कार्यालयात परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. ते जानेवारी 2022 पासून त्याबाबत पाठपुरावा करत होते. सदरील प्रस्तावास मंजुरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात जवान विशाल रमेशराव बांबलकर यांनी त्यांच्याकडे 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. दुय्यम निरीक्षक संजय पांडुरंग कुटे यांनी तडजोडीअंती 2 लाख 60 हजार रूपयांची मागणी केली. पडताळणीमध्ये दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Akola ACB Trap)

अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारोती जगताप (ACB SP Amravati Maroti Jagtap),
अप्पर पोलिस अधीक्षक अरूण सावंत (Addl SP Arun Sawant), अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे
(Addl SP Devidas Gheware) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक यु.व्ही. नामवाडे
(DySP U.V. Namwade), पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार (PI Narendra Khairnar),
पोलिस निरीक्षक सचिन सावंत (PI Sachin Sawant), पोलिस नाईक प्रदीप गावंडे, पोलिस नाईक दिगंबर जाधव,
पोलिस अभय बावस्कर, पोलिस अंमलदार श्रीकृष्ण पळसपगार, पोलिस हवालदार सलीम खान आणि पोलिस
दिलीप तीवळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : ACB Trap News | 5 lakh bribe demanded in return for beer bar license, two maharashtra state excise officials on anti-corruption ‘radar’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा Owner Jitesh Mehta पदेशात? 3 सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ; पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी G-Pay, UPI चा प्रचंड वापर, अनेक व्यापारी ‘रडार’वर

News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !