ACB Trap News | बिल्डरकडून 2 लाखाची लाच घेणारा वरिष्ठ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | बिल्डरला 5 मजली अपार्टमेंटच्या बांधकामास परवानगी देण्यासाठी 2 लाख 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2 लाख रूपयाची लाच घेणार्‍या सांगली (Sangli ACB Trap News) जिल्हयातील विटा नगरपरिषदेच्या (Vita Nagarpalika) मुख्याधिकारी विनायक विजय औंधकर Vinayak Vijay Aundhkar (47) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द विटा पोलिस स्टेशनमध्ये (Vita Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक विजय औंधकर (47, रा. मुख्याधिकारी निवास, मायणी रोड, विटा)
यांच्याविरूध्द विटा पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची 5 मजली अपार्टमेंटच्या
बांधकाम परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी मुख्याधिकारी औंधकर यांनी दि. 16 मे 2023 रोजी 2 लाख 50 हजार
रूपयाची लाच मागितली होती. तक्रारदार बिल्डरची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे
तक्रार नोंदविली. (ACB Trap News)

प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, विटा नगर परिषद येथे अ‍ॅन्टी करप्शनने सापळा रचला.
त्यावेळी सरकारी पंचासमक्ष तडजोडीअंती मुख्याधिकारी विनायक विजय औंधकर यांनी तक्रारदाराकडून 2 लाख
रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Sangli Bribe Case)

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav), पोलिस उप अधीक्षक संदीप पाटील (DySP Sandeep Patil),
पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (Police Inspector Dattatray Pujari), पोलिस अंमलदार अजित पवार,पोलिस सलिम मकानदार, पोलिस प्रितम चौगुले, पोलिस ऋषीकेश बडणीकर, पोलिस सुदर्शन पाटील,
पोलिस अतुल मोरे, पोलिस रविंद्र धुमाळ, पोलिस चंद्रकांत जाधव, महिला पोलिस वीणा जाधव,
महिला पोलिस सिमा माने आणि चालक पोलिस वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : ACB Trap News | A senior officer who took a bribe of 2 lakhs from the builder is in the net of anti-corruption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | मुळ शिवसेना कोणती?, विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईला सुरुवात; घेतला मोठा निर्णय

Pune Police Crime News | घोरपडे पेठेत क्रिकेट खेळणार्‍या युवकांनी सोनसाखळी चोरास पाठलाग करून पकडले; ACP सतीश गोवेकर, Sr PI संगीता यादव यांच्याकडून धाडसी तरूणांचा सत्कार