ACB Trap News | 3 हजाराच्या लाच प्रकरणी तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | 3 हजार 600 रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3 हजार रूपयाची लाच घेताना (Jalna Bribe Case) भोकरदन येथील तहसील कार्यालयातील (Bhokardan Tahasil Office) महसुल सहाय्यकास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अ‍ॅन्टी करप्शन विभागाने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

 

श्रीकृष्ण अशोक बकाल Shrikrishna Ashok Bakal (32, पद – महसुल सहाय्यक, तहसील कार्याल, भोकरदन. रा. शिंगणे नगर, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा – Deulgaon Raja Buldhana) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे (Bhokardan ACB Trap). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या नातेवाईकांचे 4 व्यक्तींचे भिल्ल तडवी जातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन पुर्तता करून तहसीलदार यांच्या मार्फतीने एसडीएम कार्यालय (SDM Office) येथे पाठविण्यासाठी म्हणुन प्रत्येकी 300 रूपये प्रमाणे असे एकूण 12 रूपये आणि यापुर्वी 8 फाईल्स पाठविल्याचा मोबदला म्हणून 2 हजार 400 रूपये असे एकुण 3 हजार 600 रूपयाच्या लाचेची मागणी श्रीकृष्ण अशोक बकाल यांनी केली होती. (ACB Trap News)

 

तडजोडीअंती 3 हजार रूपये लाच घेण्याचे त्यांनी मान्य केले होते. दरम्यान, तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सापळयादरम्यान श्रीकृष्ण अशोक बकाल यांनी सरकारी पंचासमक्ष 3 हजार रूपये घेतले. त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advt.

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Atole),
अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe), पोलिस उप अधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस.एस. शेख (PI S.S. Shaikh), पोलिस अंमलदार गणेश चेके, पोलिस गणेश बुजाडे,
पोलिस जावेद शेख, पोलिस चालक सुभाष नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap News | Anti Corruption Bureau Jalna Bhokardan Tahasil Office ACB Trap Shrikrishna Ashok Bakal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा