ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : लाच घेतल्यानंतर पळून जाताना महिला सरपंच आणि ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | घरकुल योजनेचा (Gharkul Yojana) लाभ मिळवुन देण्यासाठी 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Nanded Bribe Case) करून तडजोडीअंती 5 हजार रूपयाची लाच घेतल्यानंतर पळून जाताना महिला सरपंच (Sarpanch) आणि ग्रामसेवक (Gramsevak) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) पथकाच्या जाळयात अडकले आहेत (Nanded Crime News). त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरूध्द मुखेड पोलिस स्टेशनमध्ये (Mukhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

ज्योती खंडेराव पवार Jyoti Khanderao Pawar (40, पद – सरपंच, मौजे सलगरा (खुर्द), ता. मुखेड, जि. नांदेड) आणि शांताराम देविदास गवई
Shantaram Devidas Gavai (52, पद – ग्रामसेवक, मौजे सलगरा (खुर्द), ता. मुखेड, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे (Nanded ACB Trap). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या आईच्या नावाने मौजे सलगरा (खुर्द) येथे कच्चे घर असून रमाई आवास योजने (Ramai Awas Yojana ) अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता तक्रारदार यांनी मौजे सलगरा (खुर्द) येील ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला होता. सरपंच ज्योती पवार यांनी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 5 हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले होते. (ACB Trap News)

दि. 13 मे 2023 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान ज्योती पवार यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली तर आरोपी शांताराम देविदास गवई यांनी घरकुलासाठी 8 हजार रूपये लाच म्हणून दिली तर काम जिल्हा परिषदेपर्यंत पाठविण्याची जिम्मेदारी घेतली. तक्रारदार हे लाच देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यांना ज्योती पवार आणि शांताराम गवई हे भेटले नाहीत. तक्रारदार यांना गावातील पाईप लाईनचे कामावर बोलाविण्यात आले. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष ज्योती पवार यांनी लाच घेतली. त्यानंतर त्या ग्रामसेवक शांताराम गवई यांच्याबरोबर मोटारसायकलवरून पळून जात होत्या. दबा धरून बसलेल्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून लाचेचे 5 हजार रूपये देखील जप्त करण्यात आले.

 

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde),
पोलिस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil) यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर (DySP Ashok Ipper), पोलिस निरीक्षक स्वप्नाली धुतराज (PI Swapnali Dhutaraj), पोलिस अंमलदार रितेश कुलथे, सय्यद खदीर, प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Web Title :- ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak
caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बंडगार्डन पोलिसांकडून दरोडयाच्या गुन्हयातील आरोपीला अटक (Video)

Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024
मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी