मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत केलेल्या स्वच्छता कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) कुर्ला (प) येथील बीएमसी कार्यालयातील कनिष्ठ अवेक्षक व घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मुकादम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.10) करण्यात आली.
कनिष्ठ अवेक्षक शिरीष कारभारी दगडखैर Shirish Karbhari Dagdhakhair (वय-35), घनकचरा व्यवस्थापन खाते एल वार्ड मुकादम नितीन माणिक साबळे (वय-47) असे लाच स्वीकाराताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत महिला बचत गट संस्थेच्या पर्यवेक्षक यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार हे एका महिला बचत गट संस्थेचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. या संस्थेला मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत टेंडरद्वारे स्वच्छता कामाचे कंत्राट दिले आहे. तक्रारदार यांच्या संस्थेमार्फत केलेल्या स्वच्छता कामाचे बिल मंजूर करण्यासाठी शिरीष दगडखैरे याने तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे चार मासिक बिलाच्या मंजुरीसाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत मुंबई एसीबीकडे लेखी तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता शिरीष दगडखैर याने तक्रारदार यांच्याकडे स्वच्छता कामाचे बिल मंजूर
करण्यासाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 10 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
तसेच लाचेची रक्कम मुकादम नितीन साबळे याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून मुकादम साबळे याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई बृहन्मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील,
अपर पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगळे, अपर पोलीस उपायुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई एसीबी च्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पुणे : व्याजासाठी तगादा, बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; सावकारावर गुन्हा दाखल
ठेकेदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर परिसरातील घटना